Breaking News

1/breakingnews/recent

५ फेब्रुवारी-बंडातात्या कराडकर सातारा पोलिसांसमोर हजर

No comments

 

NEWS24सह्याद्रि 

वाई :गुरुवारी साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेने दंडवत आणि दंडुका असे आंदोलन केले. या वेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या  आक्षेपार्ह वक्त्यव्या प्रकरणी बंडातात्यांसह १२५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आज त्यांना सातारा पोलिसांनी पिपरंद ता फलटण राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमात भेटून पोलिसात हजर होण्याबाबत कळवले. त्यानंतर बंडातात्या कराडकर पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. 

बंडा तात्या कराडकर यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांचा जबाब घेण्यात आला. त्यामुळे त्यांना अद्याप पर्यंत अटक केलेली नाही. अटक करण्याची गरज देखील नाही,असे अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले आहे .गुरुवारी केलेल्या आंदोलनाप्रकरणी व करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणांवर विविध कलमांन्वये  गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा समिन्द्राताई जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात बंडा तात्या कराडकर यांच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल केली आहे.

 सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी जमली होती. त्या सर्वानी करोना नियमाचे उल्लंघन केले. यामुळे पोलिसांनी प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडा तात्या कराडकर, विकास शंकर जवळ, मनोज निंबाळकर यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल केला.  दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत खालच्या पातळीवर टीका केली होती.बंडातात्या कराडकर पोलीस ठाण्यात हजर झाले. गुरुवारी केलेल्या आंदोलनाची आणि वक्तव्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याच दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिस ठाणे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *