४ फेब्रुवारी-सोनाली लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी केली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
NEWS24सह्याद्री
हलव्याचे दागिने, काळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक साजशृंगार या सगळ्यात नववधूचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं.
सोनालीने संक्रांतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर हलव्याचे दागीने परिधान केले आहेत.हलव्याच्या दागिन्यांमुळे सोनालीचं सौंदर्य अगदी खुलून आलंय.‘जेव्हा संपूर्ण कुटुंब येतं एकत्र.. तेव्हाच साजरी होते पहिली संक्रांत..’ असं कॅप्शन देत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत.
तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे.सोनाली सध्या पतीसोबत दुबईत राहत आहे.सोनालीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments
Post a Comment