१२ फेब्रुवारी -आज होणार लिलाव,दहा संघ 600 खेळाडूंवर लावणार बोली
बंगळुरमध्ये आज आणि उद्या असं दोन दिवस मेगा ऑक्शन होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ आहेत.
IPL च्या 15 व्य़ा सीजनसाठी आज बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन होत आहे.आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी दहा संघ आहेत. एकूण 600 खेळाडूंवर बोली लागेल आज 161 खेळाडूंवर बोली लागेल.
IPL 2022 मेगा ऑक्शनसाठी सर्वच संघ उत्साहित आहेत. सर्वच टीम्स सोशल मीडियावर सक्रिय आहेत. राजस्थान रॉयल्सच्या CEO ने एक मजेदार टि्वट केलं आहे. चित्रपटातल्या लाइन्सवरुन त्यांनी दुसऱ्या संघांनाही संदेश दिला आहे.
IPL च्या 15 व्या सीजनसाठी आज मेगा ऑक्शन पार पडणार आहे. दुपारी 12 वाजता ऑक्शनला सुरुवात होईल. युवा टॅलेंटेड खेळाडूंसह अनेक मोठ्या खेळाडूंवर आज बोली लागेल. चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हे मेगा ऑक्शन होत आहे. यापूर्वी 2018 मध्ये असं मेगा ऑक्शन झालं होतं. जवळपास 600 खेळाडूंवर दोन दिवस बोली लागणार आहे. अनेक खेळाडूंवर या दोन दिवसात पैशांचा वर्षाव होईल. यावेळी आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ लिलावात आहेत.
सर्वच संघांनी लिलावाआधी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. प्रत्येक संघाच्या पर्समध्ये 90 कोटी रुपये होते. रिटेन केलेल्या खेळाडूंवर जितकी रक्कम खर्च झाली, त्यातून आता उर्वरित रक्कम लिलावात वापरता येईल. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटी रुपये आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वात कमी 47.50 कोटी रुपये आहेत.
No comments
Post a Comment