सह्याद्री वेगवान आढावा - रशिया-युक्रेन युद्ध अटळ?
NEWS24सह्याद्री - मुंबईत सर्वाधिक थंडी, तापमान 16 अंशांवर.... पहा महत्वाच्या बातम्या....
रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्यासंबंधी सल्ला दिला आहे. रशियाने युक्रेनलगत सीमेवर एक लाखाहून अधिक सैन्य जमा केलं आहे. यामुळे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अटळ असल्याचं बोललं जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक खडे सैन्य जमवल्यामुळे क्रिमियाप्रमाणेच युक्रेनच्या आणखी एखाद्या भूभागावर कब्जा करण्याचा रशियाचा इरादा असावा, अशीही चर्चा सुरू आहे.
No comments
Post a Comment