शहराची खबरबात - १५ ते 18 वर्षा खालील विद्यार्थ्यांचा लसीकरणाचा शुभारंभ
NEWS24सह्याद्री - स्त्री शिक्षणामुळे क्रांती निर्माण होऊन स्त्रीयांना सन्मान प्राप्त झाला - भगवान फुलसौंदर... पहा शहरातील महत्वाच्या बातम्या
महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज सुधारणेसाठी मोठे कार्य उभे केले. कर्मठ समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन त्यांना शिक्षित केले. त्याचबरोबर विधवा स्त्रीया, त्यांची मुले यांना मोठ्या हालअपेष्ठ सहन कराव्या लागत होत्या, अशा परिस्थितीत या स्त्रीयांसाठी निवारागृह उभारुन त्यांना आधार दिला. त्याचबरोबर विधवांचे केशावपणांविरोधात आवाज उठवून विधवांचे पुर्नविवाह लावले. त्यांनी केलेल्या समाजसुधारणेच्या कार्यामुळे समाजात मोठी क्रांती होऊन स्त्रीयांना सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांचे योगदान हे सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
No comments
Post a Comment