Breaking News

1/breakingnews/recent

वाचा! डिसेंबरमध्ये रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सिरीज ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय

No comments

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा महिना हा चित्रपट आणि मालिका रसिकांसाठी खूपच खास ठरणार आहे.  कारण या महिन्यात मोस्ट अवेटेड मनी हिस्टच्या 5 व्या सीझनचा दुसरा भाग प्रदर्शित होतोय. या वर्षाच्या अखेरीस, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टार, वूट सिलेक्ट आणि झी 5 यासह अनेक चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर प्रदर्शित होणार आहेत, ज्याची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर बघूया OTT वर कोणते चित्रपट आणि वेब रिलीज होणार आहेत -



१. दिल बेकरार 

२६ नोव्हेंबर - डिस्ने प्लस हॉटस्टार

हबीब फैसल दिग्दर्शित 'दिल बेकरार' मध्ये राज बब्बर, पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लन, अक्षय ओबेरॉय आणि सहार बंबा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुजा चौहानच्या दोज प्राईसी ठाकूर गर्ल्स या कादंबरीवर ही वेब सीरिज आहे.


२. छोरी 

26 नोव्हेंबर - Amazon Prime Video

'छोरी' हा हॉरर चित्रपट प्राइमवर रिलीज होणार आहे,ज्यामध्ये नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट लपाछपी या मराठी चित्रपटाचे अधिकृत रूपांतर आहे.



३. मनी हाइस्ट

डिसेंबर ३ - नेटफ्लिक्स

अॅलेक्स पिना निर्मित, मनी हेस्ट त्याच्या शेवटच्या सीझनसह परत आला आहे. हे 3 डिसेंबर रोजी Netflix वर रिलीज होईल आणि त्यात उर्सुला कोरबेरो, अल्वारो मोर्टे, इत्ज़ियर इटुनो, पेड्रो अलोंसो, मिगुएल हेरान, जैमे लोरेंटे, एस्तेर एसेबो यांच्या भूमिका आहेत. या सीझनमध्ये प्राध्यापकाच्या जीवाला धोका आहे, अशा स्थितीत हा दरोडा कसा यशस्वी होतो, याची प्रत्येक चाहत्याला प्रतीक्षा आहे.



४. बॉब बिस्वास

डिसेंबर ३.  -झी5

बॉब बिस्वास 3 डिसेंबर रोजी ZEE5 वर प्रीमियर होईल. बॉब बिस्वास हे सुजॉय घोषच्या 2012 मध्ये आलेल्या 'कहानी' चित्रपटातील एका पात्राचे नाव होते. या चित्रपटात अभिनेता शाश्वत चॅटर्जी बॉबच्या भूमिकेत दिसला होता. तो एक LIC एजंट होता, जो भाड्याने खून करायचा. त्या चित्रपटात बॉब सहाय्यक पात्र म्हणून दिसला असला तरी आता दिया अन्नपूर्णा घोष त्याच्यासोबत चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे.



५. इनसाइड एज सीझन 3

डिसेंबर ३ - Amazon Prime Video

प्राइम सदस्य 3 डिसेंबर 2021 रोजी इनसाइड एज सीझन 3 चे सर्व 10 भाग जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये बघू  शकतात. क्रिकेटचे राजकारण, ग्लॅमर, पैसा यावर यापेक्षा चांगला शो क्वचितच अएखादा असेल.



६. अरण्यक

नेटफ्लिक्स  - 10 डिसेंबर

बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनची पहिली वेब सीरिज 'अरण्यक' 10 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 'अरण्यक'ची कथा एक भयानक जंगल आणि एक रहस्यमय शहर यांच्यामध्ये फिरते. विनय वैकुल यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले असून चाहते या सिरीजसाठी कमालीचे उत्सुक आहेत.



७. मिनल मुरली

24 डिसेंबर - नेटफ्लिक्स

टोविनो थॉमस अभिनीत मल्याळम सुपरहिरो चित्रपट मिन्नल मुरली २४ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका छोट्या शहरातील एका शिंपीबद्दल आहे, जो सकाळी विजेच्या कडकडाटानंतर अनेक सुपरपॉवरसह उठतो.



८.'अंतिम: द फायनल ट्रुथ'

झी -5

वृत्तानुसार आयुष शर्माचा चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ' देखील Zee5 वर प्रदर्शित होईल. याशिवाय हाच चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. मात्र ही बातमी कितपत खरी आहे याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


९. 'आर्या 2'

डिजने हॉटस्टार प्लस

 लवकरच डिस्ने हॉटस्टार प्लसवर प्रसारित होणार आहे. चंद्रचुन सिंह, सिकंदर खेर, नमित दास, सुगंधा गर्ग आणि विश्वजित प्रधान यांच्याशिवाय 'आर्या'मध्ये अनेक स्टार्स दिसले होते. सुष्मिता सेन 'आर्या' या वेबसिरीजमध्ये आर्याची मुख्य भूमिका साकारत आहे. पहिल्या भागात सुष्मिताचा अभिनय खूप आवडला होता. चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेनेवाट पाहत आहेत.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *