शहराची खबरबात - ३ नोव्हेंबर
News24सह्याद्री : दिवाळीसाठी नगरची बाजारपेठ सज्ज..पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
TOP HEADLINES
*हॉटेल राजयोगमधील कुंटनखान्यावर छापा*
स्वतःच्या मालकीच्या हॉटेलमध्ये कुंटनखाना चालविणा-या मालकासह पाचजणांना पकडण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. अक्षय कर्डिले, सौरभ कर्डीले,विकी शर्मा,गणेश लाड, संदिप जाधव अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील , सपोनि राजेंद्र सानप,आणि नगर तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन सफौ जब्बार रहिमखों पठाण यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात स्त्रीया आणि मुलींच्याअनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments
Post a Comment