Breaking News

1/breakingnews/recent

सरदार उधम सिंग- एका सच्च्या स्वातंत्र्यवीराची कथा

No comments




इतिहासातील नोंदीप्रमाणे , १३ मार्च १९४० रोजी पंजाब प्रांताचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर (शॉन स्कॉट) यांची सरदार उधम सिंग (चित्रपटातील नायक विकी कौशल) यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 
क्रांतिकारकांना ते माफ करणार नाहीत विसरणार नाहीत असा धडा शिकवण्याचे आदेश ओडवायरने १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायरला दिले. अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे जमलेल्या सुमारे 10,000 लोकांच्या शांततापूर्ण मेळाव्यावर  जनरल  डायरने गोळीबार केला, ज्यामुळे हजारो लोक जखमी आणि ठार झाले.  या अत्याचाराचा साक्षीदार म्हणजे सरदार उधमसिंग , या शोकांतिकेचा बदला घेण्याची   शपथ घेतो. पण चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, ही केवळ एक साधी हत्या नव्हती. उधमकडे भरपूर संधी होत्या.  त्यावेळी ओडवायरला सुरक्षितपणे मारता आले असते.  पण कॅक्सटन हॉलमध्ये, जेव्हा ओडवायर "भारतीय गुलामांसाठी " ब्रिटीशांची उपस्थिती कशी फायदेशीर आहे यावर भाषण देत होता त्यावेळी त्यांनी त्याला सार्वजनिक ठिकाणी मारण्याचा पर्याय निवडला. ही हत्या म्हणजे ब्रिटीश साम्राज्यवादाच्या निषेधाचे प्रतीक होते.


उधम  हा  भगतसिंग (अमोल पराशर) पेक्षा काही वर्षांनी मोठा असला तरी, तरीही तो धगधगत्या क्रांतिकारकांकडे आदराने व कौतुकाने पाहतो. तो भगतसिंगच्या हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) मध्ये सामील होतो आणि त्त्याच्यासाठी बंदुका आणि दारूगोळा खरेदी करण्यासाठी मदत करतो हे या चित्रपटात  दाखवले आहे. 1931 मध्ये भगतसिंग यांच्या मृत्यूनंतर, तो  परदेशात स्थलांतरित झाला  आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिकांसाठी एकल एजंट म्हणून काम करू लागला . अमेरिका, रशिया, स्पेन आणि जर्मनीसारख्या दूरच्या ठिकाणांहून निधी आणि बंदुकांची तो व्यवस्था करत असे . तो आपल्याकडे अनेक पासपोर्ट आणि उपनावे राखतो, चित्रपटात अंतर्वस्त्र सेल्समन, वेल्डर,पेन,कागद यांचा  व्यापार असे अनेक व्यवसाय तो स्वीकारतो आणि इंग्रजांच्या छळाचा बदला घेण्यापूर्वी अनेक वर्षे ब्रिटिश गुप्त पोलिसांपासून दूर राहतो. तो आयरिश रिपब्लिकन आर्मीशी (IRA) संबंध असलेल्या आयलीन (किर्स्टी एव्हर्टन) या इंग्लिश महिलेच्या जवळ असल्याचे दाखवण्यात आले आहे. उधम लंडनमध्ये आयआरएच्या कार्यकर्त्यांना भेटतो आणि त्यांना त्यांचा संघर्ष आणि त्याचा संघर्ष सारखाच आहे हे पटवून देतो. दिग्दर्शक शूजित सरकार यांनी या सर्व पैलूंची निष्ठेने पुनर्रचना केली आहे असं म्हणता येईल. या ऐतिहासिक व्यक्तीबद्दल फारशी माहिती नाही. 

एका दृश्यात, जेव्हा भगतसिंगबद्दल प्रश्न केला जातो, तेव्हा तो स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्याला (स्टीफन होगन) विचारतो,  “तुम्ही २३ वर्षांचे असताना काय करत होता?”. दुसर्‍या एका प्रसंगात ते म्हणतात की आपला धर्मग्रंथ सांगतो की, माणसाचे तारुण्य त्याच्या जीवनाचा पाया आहे .“मेरी जवानी का कोई मतलब बना,”  हाईड पार्कमध्ये स्वातंत्र्य आणि मुक्त भाषण या विषयावर तो मद्यधुंद भाषण देतो, क्रांतिकारक खरोखर काय आहेत याबद्दल त्याच्या जागतिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकतो --  धार्मिक  आणि राष्ट्रीय सीमा  यांची पर्वा न बाळगता , एक माणूस या पृथ्वीवरील प्रत्येकाच्या हक्कांसाठी लढतो, प्रत्येक नागरिकासाठी समानतेची मागणी करतो. 


चित्रपटाच्या उत्तरार्धात जालियनवाला बाग हत्याकांडाचा सर्व रक्तरंजित तपशिल पुन्हा तयार करण्यात सरकर जवळपास ४५ मिनिटे घालवतात. हा भाग बघणे  एक कठीण काम आहे , परंतु उधम सिंगने 20 वर्षे आपल्या हृदयात सूडाची आग का पेटवली हे समजून घेण्यासाठी ते नक्की पहा. उधम अजूनही जिवंत असलेल्या पीडितांची काळजी घेतो, त्यांना पाणी पाजतो, त्यांना थेलामधील  हॉस्पिटलमध्ये नेतो, थकवा  येऊन  कोसळेपर्यंत तो  हे काम पुन्हा पुन्हा करत असल्याचे दाखवले आहे. “कोई जिंदा है?” असं तो विचारतो, आणि तुमच्या अंगावर रोमांच उठतात . ही सरकारची सर्वात मार्मिक सिनेमॅटिक कामगिरी आहे. तो दर्शकांना ,  त्यांना उधमासारखे असहाय्य, सुन्नपनांची भावना देताना कोणतीही कसर ठेवत नाही . यानंतर शब्दांची गरजच नाही. कारण त्याची ती प्रतिमा तुम्हाला अक्षरशः संमोहित करते आणि पुढचे काही दिवस झपाटून टाकते .


कला दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, ध्वनी रचना हे सर्व जागतिक दर्जाचे आहे. जणू काही सरकरने आम्हाला  कोणत्या तरी मार्गाने फिरवून वेळेत परत आणले आहे.  सरळमार्गी नसलेले कथन देखील चित्रपटाच्या बाजूने कार्य करते. हा चित्रपट जवळपास तीन तासांचा आहे पण एकदाही कंटाळा आला नाही. जर कलाकारांनी त्यांचे काम योग्य केले नाही तर जगातील सर्व तांत्रिक कौशल्यांना काही अर्थ नाही. हा चित्रपट विकी कौशलच्या सक्षम खांद्यावर उभा आहे आणि त्याने उधम सिंगची भूमिका साकारण्यासाठी आपला जीव ओतून काम केले आहे. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी चित्रित केलेल्या व्यक्तिरेखेच्या सर्व छटा चांगल्या प्रकारे धारण केल्या आहेत, आणि उधम सिंगचा प्रत्येक पैलू आपल्याला गोष्टी अनुभवायला लावतो -- मग तो त्यांचा क्रांतिकारी आवेश असो, भगतसिंग यांच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदर असो, की जालियनवाला बाग हत्याकांडामुळे निर्माण झालेली वेदना आणि त्याच्या गुप्त शोधाचा एकटेपणा असो. दरम्यान, हे सर्व अभिव्यक्तीच्या, देहबोलीतील सूक्ष्म बदलांद्वारे केले जाते. तो चित्रपटात एकदाही मोठा आवाज करत नाही, नव्हे त्याला ती गरजच भासत नाही.कारण त्याचे डोळे आणि शांतता त्याने चित्रित केलेल्या पात्राची लपलेली खोली प्रेक्षकांसमोर व्यक्त करून देते.


सरदार उधम सारखे चांगले बायोपिक आपलयाकडे क्वचितच बनतात . आशा आहे की आता उधम सिंगच्या या बायोपिक नंतर, कदाचित शूजित सरकार  भगतसिंगचा देखील बायोपिक बनवतील. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास अतिशय पात्र आहे आणि आम्हाला आशा आहे की निर्माते नजीकच्या भविष्यात याबद्दल नक्कीच विचार करतील.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *