Breaking News

1/breakingnews/recent

११ नोव्हेंबर - शहराची खबरबात

No comments


      News24सह्याद्री : *महिलेचा मृत्यू प्रकरणी मनपात चौकशी समिती*... पहा देश विदेशातील महत्वपूर्ण बातम्यांचा थोडक्यात आढावा गुडमॉर्निंग हेडलाईन्समध्ये ... 







TOP HEADLINES


विभागीय आयुक्तांकडून आज चौकशी

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 जणांचा बळी गेला. या दुर्घटनेशी  संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटिसा पाठवल्या आहे. संबंधित सर्वांची आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार आहे. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सहा नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अप्पर सचिव यांची रविवारी जिल्हा रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये सर्व कारणांचा शोध घेण्यात आला आणि संबंधित असलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
====================



 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *