शहराची खबरबात १७ सप्टेंबर
News24सह्याद्री - ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या कागदपत्रांची होणार.... पडताळणी पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात..!
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्तरित्या वाहनांची कागदपत्रे तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ऑटो रिक्षा आणि टॅक्सी या वाहन चालकांचे परवाने, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनचालकांचा गणवेश, बॅच आणि त्यांच्या ताब्यातील वाहन यांचे सर्व वैद्य कागदपत्रे तपासण्यात येणार आहे. ही मोहीम गणेशोत्सवानंतर सुरू करण्यात येणार असून ज्या ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांच्याकडे उपरोक्त प्रमाणे वैद्य कागदपत्रे नसतील, त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.
No comments
Post a Comment