१२ जुलै -सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - पेट्रोलचे भाव पुन्हा भडकले! पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
TOP HEADLINES
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरु
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे द्वितीय सत्राच्या परीक्षा आज पासून सुरू होत आहे. यासाठी एकूण 6 लाख 18 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. पहिल्या दिवशी 76 हजार 804 विद्यार्थी 74 विषयांची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन व प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी देण्यात आली होती. 'एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन' विद्यापीठाच्या कंपनीमार्फतच द्वितीय सत्राची परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षाबाबत कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर किंवा चॅट बॉक्सद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment