वेगवान आढावा
News24सह्याद्री - मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हापहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा...
मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव डावलण्यात आल्यामुळे बीडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. नाराज पदाधिकाऱ्यंची समजुत काढण्यासाठी मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. कोरोना नियमांना पायदळी तुडवत त्या ठिकाणी शेकडो पदाधिकारी जमले होते. यानंतर आता गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
YOU MAY ALSO LIKE
Politics
No comments
Post a Comment