शहराची खबरबात ११ जुलै
News24सह्याद्री - उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी घेतली कोरोना आढावा बैठक...पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
TOP HEADLINES
महानगर पालिकेच्या १८व्या स्थापना दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
अहमदनगर महानगर पालिकेच्या १८व्या स्थापना दिनानिमित्त नगर शहरातील कलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे, ३० जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत, यामध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा,ऑनलाईन खुली छायाचित्र स्पर्धा ,खुली ऑनलाईन कराओके गायन स्पर्धा अश्या ३ स्पर्धांचे आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ऑनलाईन खुली छायाचित्र स्पर्धेसाठी ऐतिहासिक वास्तू,निसर्ग, सुशोभित चौक, नगर शहरातील प्रेक्षणीय स्थळे,शहरातील उद्योग विश्व असे विषय देण्यात आलेत, तसेच एकपात्री अभिनयासाठी वयोमर्यादा प्रथम गट ५ ते १५ वर्ष आणि द्वितीय गट १५ ते ६० वर्ष अशी वयोमर्यादा देण्यात आलीय, या स्पर्धांबद्दल अधिक माहिती महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वर देण्यात आलीय. महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे आणि माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलंय, नगरमधील कलाकारांना या स्पर्धांमुळे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
No comments
Post a Comment