७ जुलै - सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टीतील चाळ परिसरात मोबाईल लसीकरण सुरू...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटीनमध्ये ...
TOP HEADLINES
अनिल देशमुखांच्या सहायकांना 20 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
मनी लाँड्रिंग आणि १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सहायक आणि सचिव यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी २० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे खासगी सहायक कुंदन शिंदे यांना विशेष न्या. एस. एम. भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपास यंत्रणेने या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांवर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
No comments
Post a Comment