४ जुलै - सहयाद्री गॉसिप कल्ला
News24सह्याद्री - घटस्फोटाच्या अवघ्या 24 तासांतच आमिर-किरण एकत्र...पहा मनोरंजन विश्वातील महत्वपूर्ण घडामोडी सहयाद्री गॉसिप कल्लामध्ये...
TOP HEADLINES
अभिनेते दादा कोंडकेंच्या घराची अवस्था दयनीय
महाराष्ट्राला खळखळून हसवणारे दिग्गज अभिनेते दादा कोंडके यांच्या घराची दयनीय अवस्था झाल्याच पाहायला मिळाल आहे. अभिनेता प्रथमेश परबने या गोष्टीकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत प्रथमेशने फेसबुकवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील का ? असा सवाल प्रथमेश परबने सोशल मीडियावरुन विचारला आहे. अभिनेते, चित्रपट निर्माते म्हणून दादा कोंडके यांची कारकीर्द बहरली होती. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. मात्र आज याच बहुआयामी कलाकाराच्या घराची अवस्थाच दयनीय झालीय.
No comments
Post a Comment