वेगवान आढावा
News24 सह्याद्री - आजपासून पंढरपुरात संचारबंदी तर देहू, आळंदीसह जमावबंदी पहा वेगवान आढावामध्ये
आषाढी यात्रेसाठी आजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात होतेय. यामुळं काल अनेक विठ्ठल भक्तांनी नामदेव पायरी येथे येऊन दर्शनासाठी गर्दी केली होती. आजपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत एसटी आणि खाजगी बससेवा पूर्णपणे बंद असणार असून शहरात केवळ दूध, औषधे आणि पेट्रोल , गॅस एवढीच सेवा सुरु राहणार असल्याने नागरिकांनीही खरेदीसाठी गर्दी केली आहे. आजपासून 25 जुलै पर्यंत पंढरपूर शहरात संचारबंदी असणार असून गोपाळपूर येथील संचारबंदी 24 तारखेला तर इतर 9 गावातील संचारबंदी 22 तारखेला संपणार आहे.
YOU MAY ALSO LIKE
breking
No comments
Post a Comment