२८ जून सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री -सुप्रिया सुळें समोरचं आंदोलकानी दिल्या अजित पवार मुर्दाबाद"च्या घोषणा..!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट सह्याद्री
ऐन पावसाळा आणि कोरोना संकटात पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेने कारवाई केली असून, आंबिल ओढ्यातील काही नागरिकांची घरं देखील पाडली गेली आहेत. त्यामूळे आता वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने पुणे महापालिकेच्या समोर आंदोलन करायला सुरुवात केली असून,नागरिकांनी महापालिकेच्या बाहेर ठिय्या मांडला आहे. पाडलेली घरं बांधून देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या समोरच आंदोलकांनी अजित पवारांच्या विरोधात नारेबाजी कराव सुरुवात केली.
No comments
Post a Comment