29 जुन,सह्याद्री बुलेटीन
News24सह्याद्री - कोकण रेल्वेच्या भरावामुळे पुराचा धोका..'' पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटीन.
निर्बंधांमुळे राज्यभरात व्यापाऱ्यांमध्ये असंतोष
राज्यात पुन्हा सोमवारपासून दुकाने आणि अन्य सेवांच्या वेळेत बदल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. निर्बंधांचा खेळ बंद करावा, अशी मागणी करीत पुणे, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.राज्यातील बहुतांश ठिकाणी स्तर तीनचे निर्बंध पुन्हा लागू झाल्याने अत्यावश्यक वगळता अन्य दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ अशी झाली आहे. या वेळगोंधळाचा फटका व्यापारी, ग्राहक आणि उद्योगजगतालाही बसत आहे. वेळांमध्ये करण्यात आलेल्या बदलांवर व्यापारी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दुपारी चापर्यंतची वेळ गैरसोयीची असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
No comments
Post a Comment