२९ जून गॉसिप कल्ला
News24सह्याद्री -जून' मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार अनोखी प्रेमकहाणी !पहा मनोरंजनाच्या बातम्यांचा गॉसिप कल्ला
एखाद्या जखमेवर कोणी हळुवार फुंकर मारली, तर ती जखम भरून येण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. अशीच हळुवार फुंकर कोणी आपल्या मनाच्या जखमेवर मारली तर? त्यावेळी आपल्या मनात 'फीलींग इज ब्युटीफुल' अशीच भावना येईल. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती दिग्दर्शित 'जून' हा चित्रपट ३० जून रोजी 'प्लॅनेट मराठी ओटीटी','अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी'वर प्रदर्शित होत आहे. जून महिन्यात पावसाळयाच्या आगमनाने जसा निसर्ग बहरतो, तशीच मनाची मरगळही दूर करण्याचा प्रयत्न 'जून' मध्ये करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला.
No comments
Post a Comment