शहराची खबरबात - नगर शहरातील बाजारपेठ सुरू करण्याची मागणी

News24सह्याद्री - नगर शहरातील बाजारपेठ सुरू करण्याची मागणी... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
१. नगर शहरात ९६ वर्षीय जुनी इमारत कोसळली
नगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्यासह धुवाँधार कोसळलेल्या पावसाने माणिक चौक येथील 96 वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचा एक भाग कोसळलाय . त्यामुळे इमारतीलगत असलेल्या दोन दुकांनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजतेय . मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
२. रेखा जरी खून प्रकरण ..,दोषारोपपत्र लवकरच
यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील पुरवणी दोषारोप पत्राचे तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे या आठवड्याच्या शेवटी हे पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे सुमारे दोषारोपपत्र असेल अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली.
३. नगर शहरातील बाजारपेठ सुरूर करण्याची मागणी
नगर शहरातील बाजारपेठ सुरू करण्याचा व्यापाऱ्यांच्या मागणीचा शिवसेनेकडून पाठपुरावा करण्यात येतोय यासाठी माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन द्वारे नगर शहराची वस्तूस्थिती मांडली आणि नगर शहरातील बाजारपेठ सुरू व्हाव्या याबाबत विनंती केली.
४.
निवृत्ती वेतन हयातिचे दाखले देण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
अहमदनगर महानगरपालिकेमधून जे कर्मचारी निवृत्त झालेत आणि निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी हयातीचे दाखले सादर करणे सक्तीचे असते मात्र सध्याच्या काळात कोरोना संसर्ग वाढला असल्याने महानगरपालिकेने हे निवृत्ती वेतन हयातिचे दाखले देण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
५. लुटमार करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद
दरोड्याचे गुन्ह्यामध्ये मागील सहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीसह वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना अडवुन लुटमार करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment