गॉसिप कल्ला - आयफोनवर चित्रित झाला हा पहिला मराठी ‘पिच्चर’

News24सह्याद्री - आयफोनवर चित्रित झाला हा पहिला मराठी ‘पिच्चर’... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. आयफोनवर चित्रित झाला हा पहिला मराठी ‘पिच्चर’
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या बावधन गावच्या एका नवोदित तरुणाने अव्वल कामगिरी करून दाखविलीय. चित्रपट बनवण्याच्या वेडापायी त्याने चक्क आयफोनवर अख्खा चित्रपट चित्रित केलाय दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन या चारही भूमिका जबाबदारीने पार पाडत 'दिगंबर वीरकर' हा तरुण ‘पिच्चर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
2. तुम्ही बिया द्या ! मी तुम्हाला झाड देते..! या अभिनेत्रींने सुरु केलाय नवीन उप्रकम
देऊळ बंद या चित्रपटामधून नावारूपाला आलेल्या आर्या घारे ह्या अभिनेत्रींने आता एक नवीन उप्रकमास सुरवात केली आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत तिने समाजाला एक संदेश दिलाय. 'गेल्या काही वर्षांमध्ये आपण स्वावलंबी होण्याकरता स्वतःचा जरा जास्तच विकास करून घेतलाय. म्हणून आज खुप सारेजण स्वतः च्या ऑक्सिजन टाक्या घेऊ शकतोय असो, निसर्गावर प्रेम करा, तो कधीच काही कमी नाही पडू द्यायचा.
3. अभिनेता करण मेहराला रात्रभर खावी लागली तुरुंगाची हवा, पत्नीने दाखल केली होती तक्रार!
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेमधील ‘नैतिक’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता करण मेहरा याला घरगुती वाद प्रकरणात काल (31 मे) अटक करण्यात आली होती. रात्रभर पोलीस ठाण्यात राहिल्यानंतर, आता त्याला जामीन मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, ते सध्या अभिनेत्याशी बोलत आहेत.
4. आर. माधनवचे आज वाढदिवस..!
प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा आज 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. माधवनचा जन्म 1 जून 1970 मध्ये जमशेदपूर येथे झाला. आर. माधवनने 2001 मध्ये दिग्दर्शक गौतम मेनन यांच्या 'रहना है तेरे दिल में' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
5. तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले गोविंदा आणि नीलम,
गोविंदा आणि नीलमने 10 चित्रपट एकत्र केलेत. यापैकी सहा सिनेमे सुपरहिट झालेत. यादरम्यान गोविंदा नीलमसाठी अक्षरश: वेडा झाला होता. नीलम आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले असले तरी गेल्या 20 वर्षांत त्यांना आपल्याला कोणत्या चित्रपटात एकत्र पाहायला मिळालेले नाही.
No comments
Post a Comment