'रोहित खेळला तर द्विशतक करुनचं शांत बसेल,एक दिग्गजाला आहे विश्वास

News24सह्याद्री -
जून महिन्याच्या मध्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. जवळपास २ वर्षांपुर्वी आयसीसीने या स्पर्धेला सुरुवात केली होती. क्रिकेट विश्वातील बऱ्याचशा बलाढ्य संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अखेर भारत आणि न्यूझीलंडने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. १८ ते २२ जून या कालावधीत द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे उभय संघात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची जोडी सलामीला फलंदाजी करताना दिसू शकते. तत्पुर्वी पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीज राजा यांनी हिटमॅन रोहितबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते इंडिया न्यूजशी बोलत होते.
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघाने दोन आक्रमक फलंदाजांना सलामीला पाठवणे, ही योग्य रणनिती असेल का? असा प्रश्न रमीज यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, "हो नक्कीच. जर एखाद्या संघाकडे अशी आक्रमक फलंदाजांची सलामी जोडी उपलब्ध असेल तर नक्कीच त्यांना पाठिंबा दिला गेला पाहिजे. त्यातही रोहितने जर एकदा मैदानावर तळ ठोकला तर तो द्विशतक करुनच शांत बसेल."रोहित आणि शुबमनने या सामन्यात त्यांच्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करण्याची गरज आहे. त्यांच्या त्यांच्या फलंदाजीत अजिबात बदल करायला नकोत. दोघांनीही विस्फोटक फलंदाजी करत संघाला भक्कम सुरुवात करुन द्यायला हवी. मुळातच भारतीय संघाचे विचार आक्रमक आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंनीही आक्रमकच खेळी करायला पाहिजे," असे त्यांनी पुढे म्हटले.
No comments
Post a Comment