जिल्ह्याची खबरबात - लस मोदी सरकारने दिली आहे आणि वाड्या वर बसून त्यात हस्तक्षेप करू नये

News24सह्याद्री - लस मोदी सरकारने दिली आहे आणि वाड्या वर बसून त्यात हस्तक्षेप करू नये....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
1. गंजीत लपवून ठेवला दहा पोते गांजा
एका कडब्याच्या गंजीत लपवून ठेवलेले तब्बल गांजाची दहा पोती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून जप्त केली. या गांजाची किंमत जवळपास सव्वा कोटी रुपये आहे .या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील मस्सा शिवारात कडब्याच्या गंजीत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गांजाची पोती ठेवली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.त्यानुसार पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या टीमने मस्सा शिवारातएकाच्या शेतीतील कडब्याच्या गंजीला दडवून ठेवलेला दहा गांजाची पोती जप्त करून कळंब पोलिस ठाण्यात आणली.
No comments
Post a Comment