२४ जुन सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - अमरापूरमध्ये कोविड योध्यांची मिरवणूक!...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये..
TOP HEADLINES
अकोले
सततच्या होणाऱ्या आरोपांना कंटाळून अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या काही संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार व महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी 'अगस्ति'सुरु राहान्यासाठी सर्वेतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्या मुळे संचालक मंडळाने दिलेले राजीनामे नामंजूर करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर यांनी पत्रकार परिषेदत दिली.आ. डॉ. किरण लहामटे, अशोकराव भांगरे, यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व अगस्ति च्या सद्य स्थिती बाबत चर्चा केली. तसेच इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यात आल्याची माहितीही पवार यांना देण्यात आली. यानंतर अजित पवार यानी जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांना फोन वरून अगस्ति ला मदत करण्याची सूचना केली.
No comments
Post a Comment