Breaking News

1/breakingnews/recent

१० मे Good Morning सह्याद्री

No comments

  News24सह्याद्री - कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या - जयंत पाटील....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES


1. रेल्वे प्रवाशांना करोना चाचणी सक्तीची
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करणाऱ्यांना करोना चाचणी अहवाल  आवश्यक राहणार नसल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने स्पष्ट के ले असताना पश्चिम बंगाल सरकारने महाराष्ट्रसह इतर राज्यातून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणीचा नकारात्मक अहवाल  असल्याशिवाय राज्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश काढले आहेत.

2. ‘जीएसटी’ पूर्णत: माफ केल्यास करोना औषधे, लशी महाग
करोना औषधे, लशी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणांचा देशांतर्गत पुरवठा तसेच व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर  पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील. कारण उत्पादकांना त्यांच्या उत्पादनसाखळीच्या प्रत्येक टप्प्यावर भरलेल्या कराचा परतावा अर्थात ‘इनपुट क्रेडिट टॅक्स’चा लाभ मिळणार नाही आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल.

3. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत घट
राज्याचा रुग्णआलेख घसरणीला लागला असून, रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या ५० हजारांखाली नोंदविण्यात आली. मुंबई, ठाण्यासह अनेक मोठय़ा शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे.
राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात तीन लाख नमुन्यांची चाचणी के ल्यानंतर शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या पाच हजारांनी घटली. 

4. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या
कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. 

5. मराठवाड्यात अनेक ठिकाणी वळवाच्या पावसाचा तडाखा
 राज्यात पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्याप्रमाणं मराठावाड्यात मुसळधार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं लेंढी नदी दुथडी भरून वाहत होती. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलीय. आगामी पाच दिवसांमध्ये  मध्य महाराष्ट्र, गोवा, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेनं दिला आहे. 

6. आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित
राज्य पोलीस दलातील करोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे करोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेले अधिकारी, अंमलदार बाधित झाल्याने पोलीस दल चिंतेत आहे.

7. महिला पोलिसांचा धम्माल डान्स
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तसेच उपचार वेळेवर न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झालाय. तसे काही व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर आलेले आहेत. मात्र, आजकाल सोशल मीडियावर मजेदार, प्रेरणा देणारे तसेच जनजागृती करणारे व्हिडीओसुद्धा अपलोड केले जात आहेत. सध्या असाच चेन्नईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

8. रुग्णालयाच्या वॉर्डबॉयकडूनच काळाबाजार
राज्यात दररोज हजारो नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची साहजिकच मागणी वाढली आहे. रुग्णांची संख्याच जास्त असल्याने अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही विकृत लोकांकडून रेमडेसिवीरचा सर्रासपणे काळाबाजार केला जात असल्याचं उघड होतंय. या काळाबाजाराला आळा बसावा यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरु आहे. 

9. नागरिकांनी पाण्यासाठी कर्मचार्‍यालाधरले धारेवर
औरंगाबाद वाळूज औद्योगिक सिडको वाळूज महानगरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडलल्याने.परिसरात नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांमधून सुरु आहे. रविवार  पाण्याचा दिवस असूनही केवळ 10 मिनिटेच पाणी मिळाल्याने देवगिरी नगरातील संतप्‍त रहिवाशांनी थेट जलकुंभावर धाव घेवून  कर्मचार्‍याला चांगलेच धारेवर धरले. 

10. कोरोनाबाधितांसाठी अमिताभ बच्चन सरसावले
देशभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील कोरोनाबाधितांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोविड केअर सेंटर बनवण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *