गॉसिप कल्ला - सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत
News24सह्याद्री - सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
१. बॉबी देओलची पत्नी राहते लाइमलाइटपासून दूर
बॉबी देओलची पत्नी तान्या देओल लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. तिचा सिनेइंडस्ट्रीशी फारसा संबंध नाही. ती दिवंगत देवेंद्र आहूजा यांची मुलगी आहे, अहुजा हे सेंचुरियन बँकचे प्रमोटर आणि एका मोठ्या कंपनीचे एमडी होते. तिला एक भाऊ आहे त्याचे नाव विक्रम आहूजा तर एक बहिण आहे, जिचे नाव मुनीशा आहे. बॉबी देओल त्याच्या पहिल्या बरसात चित्रपटाच्या रिलीजनंतर यशाच्या शिखरावर होता.
२. सलमानचा मोस्ट वॉन्टेड Radhe Movie ऑनलाईन
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमानचा 'राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई 13 मे रोजी रिलीज होत आहे. महत्वाचे म्हणजे हा मुव्ही प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे थिएटरमध्ये पाहता येणार नाहीय. तर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकिट काढून पहावा लागणार आहे.
३. सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री सायली संजीव. काही दिवसांपूर्वी सायलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.या फोटोमध्ये तिने एक वन पीस परिधान केला असून ती अतिशय सुंदर दिसत होती.तिच्या या फोटोवर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने कमेंट करत लक्ष वेधून घेतले होते.
४. 'माझ्या देशातील लोकं मरत असताना मी कसं लग्न करू'
'ससुराल सिमर' फेमची वैशाली टक्करचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. या महिन्यात ती डॉ. अभिनंदन सिंग हुंडलसोबत लग्न करणार अशी अपेक्षा होती. मात्र अभिनेत्रीने आता हे लग्न पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे. वैशालीने आता कोरोना संकटात गरजूंना मदत करण्याचे ठरविले आहे.
५. अनिल कपूरने दिला मदतीचा हात
कोरोना संकटात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आता अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor ) यानेही कोरोना काळात मदतीचा हात पुढे करत एका फार्मा कंपनीसोबत मिळून 1 कोटी रूपयांची देणगी देऊ केली आहे.अनिल कपूर हे 1 कोटी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Minister's Relief Fund-COVID 19)दान करणार आहे. अनिल कपूरने मॅनकाइंड या फार्मा कंपनीसोबत मिळून सीएम रिलीफ फंडात 1 कोटी रूपयांचे योगदान देणार आहे.
No comments
Post a Comment