गॉसिप कल्ला - 'राधे' रिलीज झाला आणि पाठोपाठ #BoycottRadhe ट्रेंड झाला
News24सह्याद्री - 'राधे' रिलीज झाला आणि पाठोपाठ #BoycottRadhe ट्रेंड झाला... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. 'राधे' रिलीज झाला आणि पाठोपाठ #BoycottRadhe ट्रेंड झाला.
बॉलिवूड स्टार सलमान खानचा 'राधे - योर मोस्ट वॉन्टेड भाई' हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीज झालाये. अर्थात चित्रपटगृहांत नाही तर ओटीटीवर. एकीकडे भाईजानच्या चाहत्यांच्या या सिनेमावर उड्या पडताहेत. सोशल मीडियावर या सिनेमाबद्दलचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळताहेत. दुसरीकडे ट्विटरवर '#BoycottRadhe' हा हॅशटॅगही चर्चेत आहे. होय, या हॅशटॅगअंतर्गत 'राधे'वर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.
2. विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रिकॉर्डतोड निधी;
मोहिमेतून रिकॉर्डतोड निधी गोळा केलाय . विराट व अनुष्का यांनी Ketto सोबत आठवडाभरापूर्वी एक मोहीम सुरू केली आणि सुरुवातीला त्यांनी ७ कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. हा जमा होणारा निधी भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करण्यात येणार आहे. यांनी केवळ मोहिमेसाठी दान करण्याचं आवाहन केलं नाही, तर त्यांनी स्वतः देखील २ कोटी दान केले.
3. गलती तो उन्हीं से होती है..! -
अनुपम खेर
कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले, अशी टीका कुणी केली तर अभिनेते अनुपम खेर यांनी. त्यांनी केवळ टीकाच केली नाही तर, इमेजपेक्षा सध्या लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत, असेही मोदी सरकारला सुनावले. अनुपम खेर मोदी सरकारचे कट्टर समर्थक मानले जातात.
4. कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावला मिका सिंग,
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रत्येकालाचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय लॉकडाऊनमध्ये अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहेत. अशा कठिण प्रसंगी प्रत्येकजण जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहे.
5. नदीत तरंगणारे मृतदेहांना जबाबदार कोण?
गंगा आणि अन्य नद्यांत तरंगणारे मृतदेह पाहून कुठल्याही संवेदनशील मनात कालवाकालव होईल. अभिनेते अनुपम खेर यांनी या मुद्यांवर सरकारला जाब विचारलाय . आता अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनीही नद्यांमधील या तरंगत्या मृतदेहांवर संताप व्यक्त केला आहे.
No comments
Post a Comment