वन नाइट स्टॅण्डबाबत तुझं मत काय?’, सारा अली खान म्हणाली…
मुंबई -
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सतत तिच्या सोशिअल मीडिया मूळ चर्चेत असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे लाखो चाहते आहे. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. पण सारा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा एका कार्यक्रमात तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे सुरु झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी साराने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये साराने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीही अनेक गोष्टींचा खुलासा केला. याचदरम्यान रॅपिड फायरमध्ये वन नाइट स्टॅण्डबाबत तिचं मत विचारलं. यावर सारानेदेखील क्षणाचा विलंब न करता उत्तर दिले होते.
‘वन नाईट स्टॅण्डबाबत तुझा विचार काय आहे?’ असा प्रश्न साराला विचारण्यात आला होता. त्यावर ‘मी असं अजिबात करु शकत नाही. पण मला अनेकांनी डेटसाठी विचारले होते. मी त्यांना हो बोलायचे. पण प्रत्यक्षात मात्र मी कधीच कोणासोबत डेवर गेले नाही’, असे सारा म्हणाली सारा ही अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी आहे. अमृता सिंगसोबत विभक्त झाल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत दुसरा संसार थाटला. परंतु आजही सारा आणि इब्राहिम ही दोन्ही मुले सैफसोबत वेळ घालवताना दिसतात. विशेष म्हणजे करीना या दोघांचीही सावत्र आई असून देखील त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. सारा आणि करीना या दोघींची चांगली मैत्री असून त्यांच्यातलं बॉण्डींग अनेक वेळा पाहायला मिळतं.
No comments
Post a Comment