Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - मृत जाहीर केलेले दादासाहेब पठारे पुन्हा घेऊ लागले श्‍वास

No comments

        News24सह्याद्री -





अहमदनगर जिल्हा भूविकास बँकेेचे माजी अध्यक्ष व पारनेर तालुका दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष दादासाहेब पठारे यांच्याबाबत दैवी चमत्कार घडला आहे. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सकाळी पावणेनऊच्या सुमारास हॉस्पिटल व्यवस्थापनाने पठारे यांच्या नातेवाईकांना बोलावून ‘सारे काही संपले’ असे सांगितलं आणि पठारे कुटुंबिय हादरलं! पठारे यांचे हॉस्पिटलचे बील भरून बाकी सोपस्कर पूर्ण करण्याबाबतही हॉस्पिटल प्रशासनाने कुटुंबियांना सांगितले. त्यातूनच पठारे यांच्या कुटुंबियांवर आभाळच कोसळले आणि त्यांच्या अकाली निधनाची बातमी सकाळी बाहेर आली. मात्र, पठारे यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शेवटचे प्रयत्न करा असे सांगितले. पठारे हे कोरोनातून बाहेर आले होते. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने सकाळच्या नंतर पुन्हा प्रयत्न केले. श्‍वास घेण्यास असमर्थ दिसणारे दादासाहेब पठारे हे दुपारी तीननंतर श्‍वास घेऊ लागले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी हा सारा चमत्कार असून देव आमच्या पाठीशी असल्याची भावना पठारे कुटुंबियांनी व्यक्त केली. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *