मला माझा गोरा रंग आवडत नाही ;कंगना पुन्हा चर्चेत

मुंबई -
कोणत्याना कोणत्या कारणामुळं बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. आता कंगनाची एक जूनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने गोऱ्यारंगावर वक्तव्य केले आहे.
कंगनाने वर्णभेदावर वक्तव्य केले असून फेअरनेस ब्रँडची जाहिरात करण्यावर तिने नकार दिला आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “मी स्वत:ची जागा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि हा मोठा संघर्ष होता. मला जे काम दिले मी तेच केले असते. तर मला नाही वाटतं मी इथ पर्यंत येऊ शकली असते. त्यांच्यासाठी सुंदर असणे म्हणजे गोरं असणे आहे. मी खूप गोरी होते आणि मी आणखी ३ ते ४ वर्ष तिथे टिकले असते, जे की कोणतीही गोरी व्यक्ती करू शकते. त्यांना फक्त हेच पाहिजे. पण मला ते आवडतं नाही. माझा गोरा रंग माझ्या सगळ्यात कमी आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. असे कंगना म्हणाली होती.
गोऱ्या रंगावर कंगना पहिल्यांदाच बोलली नाही. या आधी २०१३ मध्ये एका मुलाखतीत कंगनाने यावर वक्तव्य केले होते. तेव्हा कंगना म्हणाली होती की “लहान असल्यापासून मला गोऱ्यारंगाची संकल्पना समजली नाही. आपण लोकप्रिय असल्यामुळे आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. आणि जर मी फेअरनेस क्रीमच्या जाहिरती केल्या तर तरुणांसाठी हे एक चांगल उदाहरण नसेल.
No comments
Post a Comment