शहराची खबरबात - केंद्राची लस संपली, राज्याकडून दहा हजार डोस
News24सह्याद्री - केंद्राची लस संपली, राज्याकडून दहा हजार डोस... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. केंद्राची लस संपली, राज्याकडून दहा हजार डोस
राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी महापालिकेला १ मे रोजी १० हजार डोस वितरीत केले आहेत. महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांमध्ये ही लस दिली जात आहे. परंतु, ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी महापालिकेकडे लस शिल्लक नाही. लसीचा तुटवडा असल्याने महापालिकेने ४५ ते ६० या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस देणे बंद केले असून, या वयोगटातील नागरिकांना फक्त दुसरा डोस दिला जात आहे.
2. लसीकरणाचे नियोजन कोलमडले
नगरसेविका गाडे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या या लसीकरण केंद्रावर कुठल्याही प्रकारे नियोजन नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिकेने आरोग्य केंद्रावर डॉक्टरांचे नंबर दिले आहेत. परंतु हे नंबर बंद असल्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागते. नागरिकांचा संपर्क होत नाही.
3. ऑक्सीजन बेडची संख्या वाढवा ; गमे
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेऊन आगामी दहा दिवसांतील संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत किमान 1000 ऑक्सिजन बेड उपलब्ध करावे लागणार आहेत जिल्हा स्तरावरील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे त्यामुळे तालुकास्तरावर ऑक्सिजनचे बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात यावी असा आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला.
4. काँग्रेसचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच पदाधिकारी महापालिकेत मुक्कामाला
नगर शहरातील कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळावेत यासाठी महानगरपालिकेने जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभे करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेत मुक्कामी राहून आंदोलन सुरू ठेवले आहे काल सकाळपासून आंदोलन सुरू झाले होते मात्र या आंदोलनाबाबत आणि आंदोलनकर्त्यांच्या मागणीबाबत कोणताच तोडगा न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी अखेर महानगरपालिकेत मुक्काम केला.
5. सर्वांनी मिळून कोरोना साखळी तोडावी तनपुरे
तनपुरे यांनी नगर तालुका दौऱ्यात बुऱ्हाण नगर येथे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या कोवीड सेंटरची पाहणी केली त्यात दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत विचारपूस केली तसेच तहसीलदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही महत्त्वाच्या सूचना दिल्या. नगर मधील कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे ग्रामीण भागातील नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे सर्वांना मिळून ही कोरोनाची ची साखळी तोडायचे आहे.
No comments
Post a Comment