जितेंद्र सापडले खऱ्या अर्थाने कात्रीत ; हृतिक आणि एकतामध्ये झाले होते भांडण
मुंबई -
एकता कपूर हिला छोट्या पडद्यावरील क्वीन असे म्हणतात. तिने आजवर अनेक सुपरहिट मालिकांची निर्मिती केली आहे. परंतु खरे तर तिला लहानपणापासून अभिनेत्री होण्याची इच्छा होती. यासाठी तिने डान्सचे प्रशिक्षण देखील घेण्यास सुरुवात केली होती. अन् एकदा तर तिने आपल्या डान्सचा जलवा दाखवण्यासाठी चक्क हृतिक रोशनला आव्हान दिले होते. पण त्यावेळी असे काही घडले की ज्यामुळे जितेंद्र कोंडीत सापडले होते. एकताचा 11 वा वाढदिवस होता. संध्याकाळी वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींची मुले आली होती. या पार्टीत हृतिक रोशन देखील आला होता. हृतिक आणि एकताचे फारसे चांगले जमत नसे दोघांमध्ये सतत भांडणे होत असते. पण त्या भांडणाचे कारण त्यादिवशी सर्वांना कळाले. एकताने हृतिकला डान्ससाठी आव्हान दिले.
हृतिक लहानपणापासूनच एक उत्तम डान्सर आहे. यापूर्वी त्याने अनेक स्पर्धा देखील जिंकल्या होत्या. त्यामुळे त्याने लगेच आव्हान स्विकारले. दोघांनी डान्स करण्यास सुरुवात केली. एकता जाड असल्यामुळे तिचा डान्स पाहून सर्व मुले तिला हसू लागली. तर दुसरीकडे सर्वांनी हृतिकच्या डान्सचे कौतुक केले. अर्थात हे कौतुक एकताला आवडले नाही. शिवाय त्या स्पर्धेचं बक्षिस जितेंद्र यांनी हृतिकला दिले. त्यामुळं एकता वडिलांवर खुप नाराज झाली होती. माझा वाढदिवस, माझी पार्टी, आणि बक्षिस त्याला हे चूक आहे. असे म्हणत ती वडिलांवर नाराज झाली होती. त्यावेळी जितेंद्र खऱ्या अर्थाने कात्रीत सापडले होते. एकताच कौतुक करावे की हृतिकचे हा प्रश्न त्यांना पडला होता. हा गंमतीशीर किस्सा त्यांनी द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला होता. हा किस्सा ऐकून सर्व प्रेक्षकांनी एकच हास्य कल्लोळ केला होता.
No comments
Post a Comment