चंदेरी रंगाच्या साडीमध्ये माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस अंदाज,लाखो चाहते घायाळ
मुंबई -
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने नृत्यातील तिच्या मनमोहक अदांसाठी प्रसिद्ध आहे. स्मितहास्य अन् लाजाळू भाव तिच्या सौंदर्याला चार चाँद लावतात. अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. माधुरीने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
माधुरीने परिधान केलेल्या चंदेरी रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. त्यावर तिने सिंपल अशी ज्वेलरी परिधान केली आहे. माधुरी दीक्षितच्या अदांनी आजही लाखो चाहते घायाळ होत असतील यात काही शंका नाही. माधुरीच्या चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.
No comments
Post a Comment