मोठी बातमी - दारूने कोरोना संपतोय का?
News24सह्याद्री -
कोरोनाच संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रशासनाने नगर जिल्ह्यात कडक निरबंध लागू केले आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा सोडली तर सर्वच दुकाने बंद करण्यात अलीयत. दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेने काही दुकानाबाबत निरबंध शिथिल केले होते मात्र पुन्हा गर्दी वाढू लागल्याने महापालिकेने नवीन आदेश काढून किरणा आणि भाजीपाला दुकाने बंद केलीयत. तर काही दुकानावर दंडात्कम कारवाई केलीय. निश्चित कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी हे करणे गरजेचे आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील काही दारू दुकाने सर्रास दुकाने सुरु ठेवत दारू विक्री करताना महापालिकेच्या आणि पोलिसांच्या नजरेतून कसे काय सुटतात हा न उलगडणारा प्रश्न आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानांना सकाळी सात ते आकरा घरपोच दारू विकण्याची परवानगी दिलीय. मात्र, काही महाभाग दुकानदार दुकानाच्या बाहेरच आपले पंटर उभा करून सर्रास रोडवर दारू विक्री करतायत.
मग आयुक्त साहेब भाजीवाला चोर आहे का ? किराणा माल विकणार चोर आहे ? त्यांना बंदी का ? नाही,.. दारू विकणार्यांना आणि घेणार्यांना कोरोना होणार नाही का ? का फक्त भाजी आणि किराणा विकणाऱ्यांनाच कोरोना होणार? हा सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे या प्रश्नावर महानगर पालिकेचे आयुक्त शन्कर गोरे यांनी काय उत्तर दिलीयेय पाहुयात आपण पहिलत महापालिका आयुक्तांनी प्रश्नावर उत्तर तर दिले आणि नागरिकांना आवाहन हि केलंय कि असा प्रकार कुठे उघडत असेल तर थेट मला संपर्क करा तर आम्ही त्यांच्या आवाहनानुसार त्यांचा मोबाईल क्रमांक जनतेसाठी जाहीर करत आहोत ७० ५८ २१ २१ ९३ हा महानगर पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांचं मोबाईल नंबर असून या आपण संपर्क करू शकता रोजंदारीवर हातगाडी घेऊन फळ विक्री करणारे नागरिक शहारात शेकडोने सापडतील मात्र त्यांच्या पोटावर पाय देऊन आणि पांढरपेश्या दारू विक्री करणाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन का उभा राहतेय ? जर दारूने कोरोना बरा होत असेल म्हणून दारू विक्रीला परवानगी आहे. असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणि महापालिका प्रशासनाने जाहीर करावे म्हणजे बाकीचे सर्व गप्प बसतील आयुक्त साहेब तुम्ही शहराचे पालक आहेत सर्वाना सामान न्याय द्या गोरोबरीबांच्या शेतकऱ्यांच्या भाजी विक्रेत्यांवर अन्याय करू नका.
No comments
Post a Comment