जिल्ह्याची खबरबात - कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहावे
News24सह्याद्री - कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहावे....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
१. लसीकरणासाठी कोरणा चाचणी बंधनकारक
कोरोना बाधित रुग्णांनी लसीकरण केल्यास त्याचा फायदा होत नसल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार लसीकरण यापूर्वी कॉमेडी चाचणी बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलीये पारनेर तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांची आता कवी टेस्ट करण्यात येणार आहे.
२. कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहावे
प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहावे असे आव्हान आरोग्य समिती चे माजी सभापती नगरसेवक अनिल उर्फ कालूआप्पा आव्हाड यांनी केले. गेल्या वर्षीपासून कोरोनाने भारतासह अनेक राष्ट्रात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी कोरोना रुघणांची संख्या कमी होती. मात्र गेल्या तीन महिन्यापासून दुसरी कोरोनाची लाट आली आहे या लाटीत रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. प्रशासन रुग्ण संख्येला नियंत्रणात आणण्याकरिता विशेष प्रयत्न करीत आहे. त्याचा परिणाम सध्या रुग्ण संख्येतुन दिसून येते.
३. घरीबसुन विद्यार्थी जाणून घेतायत परंपरा
गेल्या वर्षभरापासून कोरोणा महामारीच्या फैलावामुळे शाळा बंद होत्या त्यातच अकरावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास केले आहे त्यामुळे लहान मुले सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. सुट्ट्या मधून आपल्या परंपरा जाणून घेण्याची उत्सुकता शेवगाव तालुक्यातील मुलांमध्ये दिसते. उन्हाच्या तडाख्यामुळे घरातच बाल सवंगड्यांसोबत बैठे खेळ खेळत तसेच घर कामात पालकांना मदत करत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात.
४. पाथर्डी तालुक्या मध्ये जनता कर्फ्यू असताना देखील कापड दुकान चालू
पाथर्डी नगरपालिकेचे फिरते पथक शहरांमधून फिरत असताना पाथर्डी येथील एक कापड दुकानदाराने मागच्या बाजूस ग्राहक करत असल्याचे निदर्शनास आले सदरील दुकानदाराला पाथर्डी नगरपालिका कर्मचारी यांनी बजावले व दहा हजार रुपयाची दंडाची रक्कम वसुली केली.
५. आठवड्याभरात शहरात सापडले दोन पिस्टल
आठवडाभरापूर्वीच शहरातील प्रांत कार्यालयाजवळ एकाला पोलिसांनी पिस्टल सह पकडले होते. ती घटना ताजी असतांनाच श्रीरामपूर शहरातील रेणुकानगर,एमआयडीसी भागात एका तडीपार गुन्हेगारासह ०२ जणांना शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असुन आरोपींच्या ताब्यातील होंडा डिओ गाडीच्या डिक्कीमध्ये एक पिस्टल व ०१ जिवंत काडतूस पोलीसांना मिळाला आहे.
६. रमझान ईदची नमाज घरी अदा करावी
शहर पोलीस स्टेशन येथे झालेली बैठक मध्ये पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत या वर्षीही कोरणा चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व समाज बांधवाच्या हिताच्या दृष्टीने घरात बसूनच ईदची नमाज अदा करावी अशा विनंती सह आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
७. अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात बेकायदा मुरूम वाहतूक ?
संगमनेर मधील बोटा गावच्या माळवाडी शिवारातून गेल्या काही दिवसांपासून खासगी क्षेत्रातून बेकायदेशीररीत्या मुरूम उपसा होत आहे. पुणे नाशिक महामार्गावरीन आळेफाटा बायपास साठी इथून मुरूम नेला जातोय. अधिक क्षमतेच्या धमपर मधून या मुरुमाची वाहतूक केली जातीये. पहाटे ४ ते रात्री १० पर्यंत सलग १८ ततास हा उपसा केला जातोय. बेसुमार मुरूम उत्खननकडे महसूल यंत्रणांच आणि स्थानिक जबाबदार घटकांचं यांच्याकडे होणार दुर्लक्ष संतापजनक आहे.
८. लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दररोज १२८ सिलेंडर उत्पादित होतील इतक्या क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट ग्रामीण रुग्णालय इथे उभारणार असल्याची महत्वपूर्ण माहिती ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलीये. याच बरोबर ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय त्यांना वेळेत दुसरा डोस देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.
९. जिल्हाधिकाऱ्यांकडून कोव्हीड केअर टीम चे कौतुक
श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोळगाव, घारगाव, लोणी वयांकनाथ येथील कोव्हीड सेंटरच्या कामगिरीचं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कौत्यूक केलाय. ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन वितरण गृह प्रकल्प आणि ५० बेडच अतिरिक्त सेंटर उभा करण्याची तयारी पहिली आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
१०. नेवासा तालुक्यातील माका येथील जवान नवनाथ भुजबळ यांचे जम्मूमध्ये हृदयविकाराने निधन
नेवासा तालुक्यातील माका येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान नवनाथ रंभाजी हृदय विकाराने निधन झाले जवान नवनाथ त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथ ते पंधरा दिवसांपूर्वी माका येथून ड्युटीवर गेले होते तर कालच त्यांची चंदिगड होऊन जम्मूला बदली झालीअसून लय मधील त्यांचा ड्युटी चा आजचा पहिला दिवस होता.
No comments
Post a Comment