Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - केडगावला शिवसेनेचा पाठपुराव्याने लसीकरण केंद्र सुरू

No comments

  News24सह्याद्री - केडगावला शिवसेनेचा पाठपुराव्याने लसीकरण केंद्र सुरू..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

१. भुकेलेल्या गरजूंना  शंकर बाबा मठाचा आधार
राज्यासह नगर जिल्ह्यात कोरो ना ने थैमान घातले आहे.  बहुतांशी ठिकाणी लॉक डाऊन आहे. त्यामुळे बहुतांशी लोकांसमोर एक वेळच्या जेवणाची अडचण निर्माण झाली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे अश्यांची अवस्था बिकट आहे. बाहेर गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन ला देखील आलेल्या प्रवाशांचे अन्ना वाचून हाल सुरू  असताना अहमदनगर मधील शंकर बाबा मठाच्या वतीने गोर गरिबांना अन्नाचे पाकीट वाटप केले जात आहे. 

2. अहमदनगर शहरांमध्ये कोरोनाच थैमान चालू 

असतानाच काही खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांना अवाजावी बिले देऊन जास्तीचे पैसे घेण्यात येत असल्याची तक्रार अनेक वेळा पुढे येत आहे याबाबत प्रशासनाने एक कमिटी नेमलीय मात्र अद्यापही बिला बाबत तक्रारी सुरूच असून अवाजावी बिल आकारात असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करताना दिसताहेत केडगाव येथील एका खाजगी दवाखान्यात पीपीइ किट  च्या नावाखाली लूट होत असल्याची तक्रार रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

३. लिड ची चोरी करणारे दोघेजण गजाआड
नगर एमआयडीसी मधील एक्साइड लिमिटेड कंपनी मधून लीडची चोरी करणारे दोन आरोपी पकडण्यात आले आहेत अजित चंद्रभान शिंदे आणि आकाश जयसिंग आगळे अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

४. केडगावला शिवसेनेचा पाठपुराव्याने लसीकरण केंद्र सुरू
शहरासह उपनगरात असलेल्या लसीकरण केंद्रावर कोरोना  लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी होऊन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पाठपुराव्याने केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे यामुळे एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांचे लसीकरण होते.

५. जिल्ह्याला लस उपलब्ध करून देण्याची शासनाकडे मागणी
नगर जिल्हा विस्ताराने आणि लोकसंख्येने खूप मोठा आहे त्यातच नगर जिल्ह्यावर कोरणा संसर्ग विषाणूचे मोठे संकट ओढवलेय दररोज कोरोनाचे  हजार रूग्ण सापडतायत अणि  दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यूही झालाय या कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येक नागरिक भयभीत झालाय आता प्रत्येक नागरिकांसमोर एकच आशेचा किरण आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *