गॉसिप कल्ला - महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका!
News24सह्याद्री - महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका!... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. महाराष्ट्राकडून शिका; नेटकरी म्हणाले, विनोद करू नका!
संपूर्ण देशात सध्या कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. स्थिती बिकट आहे. औषधांचा, ऑक्सिजनचा आणि रूग्णालयातील बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. अशास्थितीत बॉलिवूडचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
2. इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत
कंगना राणौत आणि वादाचे जुने नाते आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत असते. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर कंगनाने ट्विटरवर अतिशय तीव्र शब्दांत पोस्ट लिहिली आणि यानंतर ट्विटरने कंगनाचे अकाऊंट कायमचे सस्पेन्ड करण्यात आले.
३. प्रभासच्या सिनेमाचा संपूर्ण सेट कोरोना रूग्णांसाठी दान केला
भारतात कोरोनाची स्थिती भीषण आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत आणि आरोग्य यंत्रणा पार कोलमडली आहे. अशास्थितीत फिल्म इंडस्ट्रीचे अनेक लोक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. सुपरस्टार प्रभासच्या 'राधे श्याम' या आगामी सिनेमाच्या मेकर्सनी असाच मदतीचा हात दिला.
४. तुम्ही त्याच लायकीचे आहात...! सोनू निगम
बॉलिवूड सिंगर सोनू निगम या ना त्या कारणाने चर्चेत असतोच. काहीच दिवसांपूर्वी सोनू निगम रक्तदान करताना दिसला होता. रक्तदान करतानाचा फोटो शेअर करत, त्याने याची माहिती दिली होती. मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्याचा हा प्रयत्न त्याच्यावरच उलटला. कौतुक करण्याऐवजी हा फोटो पाहून लोकांनी त्याला ट्रोल केले होते. कारण काय तर मास्क. रक्तदान करताना सोनूने तोंडावर मास्क लावला नव्हता. त्यामुळे नेटक-यांनी त्याला जबरदस्त ट्रोल केले होते.
५. कोरोनाने नाही तर अपयशी आरोग्य यंत्रणेने मारले...! अभिनेत्री मीरा चोप्रा संतापली
प्रियंका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रा हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाये. गेल्या 10 दिवसांत मीराने आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांना गमावले. आता दोन सदस्यांच्या या मृत्यूसाठी मीराने सरकारला जबाबदार ठरवले आहे, माझ्या कुटुंबातील लोकांना कोरोना व्हायरसने नाही तर या देशातील कमकुवत आरोग्य व्यवस्थेने मारले, अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.
No comments
Post a Comment