सन्माननीय नितिन गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा – रोहित पवार
मुंबई -
कोरोनाचा प्रभाव अत्यंत वाढत असल्यामुळे देशात कोरोना जेवढ्या वेगाने पसरत आहे. तेवढ्याचं वेगाने राजकारण देखील होत आहे. कोरोना काळात देखील राजकारणाला उत आला आहे. कोरोना परीस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोध सतत एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नितीन गडकरी यांनी खडे बोलं सुनावले आहे. रविवारी नागपूर कार्यकारिणी बैठकीत नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना साथीच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी पक्षाने बरीच कार्यकर्ते गमावली आहे, म्हणून प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे आणि समाजसेवा करताना राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. याचा हवाला देत आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपाला सल्ला दिला आहे.
रोहित पवार म्हणाले, “कोविडची लढाई लढत असताना आजच्या अडचणीच्या काळात कुणीही राजकारण करू नये’, हा सन्माननीय नितिन गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ते देशातले मोठे नेते आहेत. माझ्यासारखे अनेकजण त्यांच्याकडून शिकत असतात. अपेक्षा आहे राजकारण करणारे, त्यांचा हा सल्ला मानतील. गडकरी म्हणाले, समाजसेवेत राजकारण करू नका कारण केवळ तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय कार्यकर्त्यांसह भाजपाला जाईल. हा साथीचा रोग किती काळ टिकेल हे कोणालाही माहिती नाही, म्हणून आपण सर्वोत्कृष्ट विचार केला पाहिजे आणि सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहावे. कार्यकर्त्यांना राजकारणाचा खरा अर्थ सांगताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, राजकारण म्हणजे केवळ सत्तेत राहणे नव्हे तर ते सामाजिक कार्य आणि राष्ट्रवाद आहे. ‘आपण जाती, धर्म किंवा पक्षाचा विचार न करता समाज आणि गरिबांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना मदत केली पाहिजे.
No comments
Post a Comment