गॉसिप कल्ला - किरण खेर यांच्या निधनाची अफवा
News24सह्याद्री - किरण खेर यांच्या निधनाची अफवा... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. मातृदिनी करिना कपूरचे चाहत्यांना अनोखे 'गिफ्ट'
मातृदिनी अभिनेत्री करिना कपूर-खान हिने चाहत्यांना अनोखे गिफ्ट दिले आहे. करिनाने आपल्या छोट्या राजकुमाराचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तैमूरसोबत हा फोटो शेअर करण्यात आला असून चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.करिना कपूर-खान हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे.
2. अभिनेत्री गौतमी देशपांडेने व्यक्त केली कृतज्ञता
२)आई या एका शब्दात संपूर्ण विश्वाचं अस्तित्व सामावलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आईच असते. त्यामुळे आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्पेशल दिवस कशाला हवाय… माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा 'मदर्स डे'च असतो, अशी भावना अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने व्यक्त केली आहे.
3. शिल्पा शेट्टीच्या जागेवर मलाइका अरोरा
डान्सर रियलिटी शो असलेल्या 'सुपर डान्सर चॅप्टर 4′ च्या परीक्षकपदी आतापर्यंत शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू हे तिघेजण दिसत होते. मात्र, आता शिल्पाच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे तिला क्वॉरंटाईन होणे भाग आहे.
4. किरण खेर यांच्या निधनाची अफवा
अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री खासदार किरण खेर यांच्या निधनाची अफवा आज जोरात पसरली होती. त्यामुळे अनुपम खेर यांनी सोशल मीडिया वरून त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.इन्स्टाग्रामवर दिलेल्या स्पष्टीकरणात किरण खेर सुस्थितीत असल्याचे अनुपम यांनी म्हटले आहे. किरण यांनी करोना लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. त्यामुळे आता लोकांनी निगेटिव्ह बातम्या पसरवू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.
5. कॅमिला कॅम्बेलाचा "सिंड्रेला' ऍमेझॉन प्राईमवर दिसणार
कॅमिला कॅम्बेलाचा लीड रोल असलेला 'सिंड्रेला' लॉकडाऊनमुळे आता थिएटरवर रिलीज होणार नाही. त्याऐवजी हा हॉलीवूडपट ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. ऍक्शन आणि म्युझिकचा सुंदर मिलाफ असलेल्या या परीकथेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करावे लागणार आहे.
No comments
Post a Comment