शहराची खबरबात - कोरोना काळात नगर मधील सामाजिक संघटनांच्या योगदानाची इतिहासात नोंद होईल
News24सह्याद्री - कोरोना काळात नगर मधील सामाजिक संघटनांच्या योगदानाची इतिहासात नोंद होईल... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. मनपाची प्लाजमा निर्मिती मशीन धूळखात
कोरोना काळात प्रशासनाकडून कोरणा मुक्त रुग्णांना प्लास्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे मात्र प्रत्यक्षात महापालिकेच्या रक्तपेढी मधील प्लाजमा निर्मिती मशीन धूळ खात पडून आहे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे लाखोंचा निधी देऊनही मशीन कार्यान्वित झाली नाही परिणामी शहरातील नागरिकांना सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर बोरुडे यांनी केला.
2. वादळाने महावितरणची दैना
महावितरणने पावसाळी दुरुस्तीची कामे वेळेत सुरू केलेली नव्हती त्यामुळे चक्रीवादळात अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यास दूरध्वनीवरून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता .विशेष म्हणजे ग्राहकांचा फोनच उचलला जात नव्हता पहिल्याच मोठ्या वादळात महावितरणची व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलेली पहायला मिळाली .
3. वीजतारेच्या धक्क्याने कानडे मळ्यातील सहा म्हशी ठार
चक्रीवादळाचा फटका बसून कानडे मळ्यातील सदाशिव निस्ताने यांच्या सह म्हशींना तुटलेल्या वीजतारेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला . सारसनगर शेजारील कानडे मळा येथील शेतकरी सदाशिव निस्ताने यांच्या तीस म्हशी कानडे मळ्याजवळील भिंगाऱनाल्यामध्ये सोमवारी दुपारी पाणी प्यायला गेल्या चक्रीवादळामुळे विजेच्या तारा तुटून त्यांचा स्पर्श म्हशींना झाला तर सहा म्हशी जागीच ठार झाल्या.
4. कोरोना काळात नगर मधील सामाजिक संघटनांच्या योगदानाची इतिहासात नोंद होईल ; आमदार जगताप
नगर मधील 9 सामाजिक संघटनांनी एकत्र येत सोमवारी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात नागरिकांसाठी अँटीबॉडी तपासणी अभियान राबविले या अभियानाच्या शुभ प्रसंगी संग्राम जगताप म्हणाले की कोरोना काळात नगर शहरातील सामाजिक संघटना देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे कोरूना चाचणी , कोवीड केयर सेंटर , रुग्ण व नातेवाइकाची जेवणाची व्यवस्था अशा प्रत्येक गोष्टीत या संघटना पुढे येत आहेत डॉक्टर आरोग्य कर्मचारी त्यांच्या प्रमाणेच या संघटनांचे सभासद देखील कोविद योध्याप्रमाणेच काम करीत आहेत हे अभियान राबवून या संघटनांनी कोवीड काळात महत्त्वपूर्ण काम केले आहे.
5. आयुक्तांचा आदेश धाब्यावर ओढा नाल्यांची साफसफाई सुरू
मागील वर्षी शहरातील नाल्यांची हद्द निश्चित करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता मात्र गेल्या वर्षभरात याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. मनपाने पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई सुरू केली असून यंदाही नालेसफाई होणार नसल्याचे यावरून अधोरेखित झाले. महापालिकेच्या वतीने शहरातील नालेसफाईचे काम रविवारी सुरू करण्यात आले ओढानाल्यातील जिथे मोकळी जागा आहे तोच भाग फक्त गाळ काढून प्रवाह मोकळा करणे असे यंदाच्या नालेसफाई मोहिमेचे स्वरूप आहे. मागील वर्षी पावसाळ्यात नाल्यातून नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नालेसफाईची पाहणी करून त्यांची हद्द निश्चित करण्याचा आदेश नगररचना विभागाला दिला होता.
No comments
Post a Comment