शहराची खबरबात - यादीत नाव असलेल्यांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार
News24सह्याद्री - यादीत नाव असलेल्यांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हे दाखल करा.. गाडीलकर
कोरोणा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर शहराला लसीकरणाचा कोठा वाढवून मिळावा. तसेच जास्तीत जास्त नागरिकांची कोरोणा चाचणी करून कोरोणा संसर्ग थांबविण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचा आहे. लसीकरण केंद्रावर गर्दीचे नियोजन करून गर्दी कशी नियंत्रणात आणता येईल, यासाठी उपाययोजना कराव्यात लसीकरण केंद्रावर गोंधळ घालणाऱ्या वर गुन्हे दाखल करा. अशा सूचना नाशिकचे विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांनी दिल्या. नगर शहरातील वाढती कोरुना रुग्ण संख्या पाहता नाशिकचे विभागीय उपायुक्त गाडीलकर यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली.
2. नगर तालुका पोलीसस्टेशनची धडाकेबाज कामगिरी
कामरगाव येथे अपघात करून दोन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपी उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे रा. पिंपरीआंतरवन जि.बीड नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्याच्या ताब्यातील चोरीचे वाहन क्रमांक एम एच बारा एच एन ८४६२ हे रस्त्याने भरधाव वेगात चालून दोन व्यक्तींचा अपघात करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाला व सदरचा गुन्हा करून आरोपी फरार झाला होता.
3. यादीत नाव असलेल्यांनाच कोविशिल्डचा दुसरा डोस मिळणार
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना याला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात लसीचा तुटवडा कायम आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. यातच ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देखील सुरु आहे. महापालिकेच्या वतीने कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांची यादी जाहीर केली जाणार असून, यादीत नाव असलेल्यांनाच बुधवारी डोस दिला जाईल.
4. सलग दुसऱ्या वर्षी रमजानवर कोरोणाच सावट
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच सावट निर्माण झाल्याने यंदाही साधेपणाने रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे ईद निमित्त बाजारपेठेत असणारा खरेदीचा उत्साह आणि यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल यंदाही टप्पा आहे रमजान महिन्यात टरबूज खरबूज आणि इतर फळांना मोठी मागणी असते यंदा करुणा चा मोठा प्रादुर्भाव वाढल्याने लोक डाऊन मुळे या वस्तूंची खरेदीवर परिणाम आणि विक्रीवर ही मोठा परिणाम झाला आहे.
5. लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरिबांना मिष्ठान्न भोजन
अहमदनगर- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्याचा परिणाम गोरगरीब जनतेवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हाताला काम नाही पोटाला जेवण नाही. त्यामुळे अनेक जनावर उपासमारीची वेळ आली आहे मात्र अशा काळातही अनेक सामाजिक संघटनेकडून सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात दिला जात आहे जो तो आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे वाडियापार्क मित्र मंडळ व गाळेधारकां कडून अशाच प्रकारे रोज 200 ते 250 गोरगरीब गरजूंना रोज दुपारचे भोजन दिले जात आहे.
No comments
Post a Comment