गॉसिप कल्ला - रितेश देशमुख, जेनेलिया ने घेतली कोरोना लस, लोकांना केले आवाहन
News24सह्याद्री - रितेश देशमुख, जेनेलिया ने घेतली कोरोना लस, लोकांना केले आवाहन... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
१. धिक्कार असो अशा मंत्र्यांचा, सोनू किंवा सलमानला पंतप्रधान बनवा...! राखी सावंत
कोरोनाची दुसरी लाट लोकांच्या जीवावर उठलीय. रोज हजारो लोक जीव गमवत असून लोक हवालदिल झाले आहेत. साहजिकच देशातील ही स्थिती बघता, सरकारबद्दल असंतोष निर्माण होतोय सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक सरकारवर टीका करत असून राखी सावंत त्यापैकीच एक कोरोना काळात राजकीय मंडळींचा नाकर्तेपणा पाहून राखी सावंत कमालीची भडकली.
२. आजपर्यंत कधीही न केलेल काम करण्याचे धाडस केले -प्रिया बापटची पोस्ट चर्चेत
गेल्या काही दिवसांमध्ये सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. मात्र योग्य उपचार घेतल्यानंतर बरेही होत आहेत. कोरोना काळात अनेक सेलिब्रेटी जमेल तशी प्रत्येकाला मदत करत आहेत. नुकतेच अभिनेत्री प्रिया बापटनेही तिच्या आयुष्यात मोठ्या धाडसाने एक काम केले आहे. आजपर्यंत तिने रक्तदान केले नव्हते. सुईची भीती वाटते म्हणून कधीच रक्तदान करण्याची हिंमत होत नव्हती.
३. रितेश देशमुख, जेनेलिया ने घेतली कोरोना लस, लोकांना केले आवाहन
देशभरात कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाये. याच कोरोनाला प्रतिबंधक असलेली लस आता नागरीक घेत असून . कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेण्याचं आवाहन अनेक जण करत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर सोशल मिडीयावर फोटो शेयर करून इतरांनाही लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
४. 'बबीताजी' अडचणीत, सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी;
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवीन फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते. रविवारी तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आणि चाहते संतापले. इतके की, सोशल मीडियावर मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी सुरू झाली.
५. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची बाधा,
देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज व्हायरसचे शिकार ठरलेत. आता हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत, याऊपरही त्यांना कोरोनाने गाठले.घरात राहा आणि सुरक्षित राहा... "मी कोरोना पॉझिटीव्ह आहे, अशी इन्स्टास्टोरी त्यांनी शेअर केली आहे.
No comments
Post a Comment