शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय,राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
मुंबई -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता पुन्हा एकदा आपल्या कामात सक्रिय झाले आहे. दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापुर्वी फेसबुक लाईव्ह केले. त्यात पवार आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहे. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.
No comments
Post a Comment