Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन

No comments

News24सह्याद्री - पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या




TOP HEADLINES


१. मढी देवस्थानच्या वतीने पाथर्डी शहर प्रेस क्लब ला मास्क व सॅनिटायझर
 मढी देवस्थानच्या वतीने पाथर्डी शहर प्रेस क्लब ला मास्क व सॅनिटायझरचे पाथर्डी येथील शासकीय विश्रामग्रह येथे वाटप करण्यात आले. मढी देवस्थान एक सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच कार्यरत असतात त्यांच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्याला पाच लाख रुपयांचे किट देण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी शहर क्लबला सेंटर देण्यात आले. यावेळी पाथर्डी शहर अध्यक्ष उमेश मोरगावकर व सर्व सदस्य उपस्थित होते 

२. शेवगाव तालुक्यातील शासकीय रुग्णालय -रामनाथ राजपुरे
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आपल्या मुलाच्या  डिशचार्जसाठी आलेल्या राजपुरे कुटुंबीयाकडून येथील कोविड सेंटरवर काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या. बोधेगाव येथील ग्रामिण रुग्णालयात सुरू झालेल्या शासकीय कोविड सेंटरमुळे या भागातील लोकांना आपल्या भागातच कोविडचे सर्व उपचार मिळत असून ग्रामीण भागातील रुग्णांना एक प्रकारचा आधार देऊन दिलासा देण्याचे काम घुले कुटुंबांनी केले आहे.असेदेखील रामनाथ राजपुरे बोलताना म्हणाले.

३. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
शेवगाव तालुक्यात दोन दिवसापासून तीव्र गतीने वाहणारे वारे व पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हतगाव हा शेतीस सुपीक असणाऱ्या जमिनीचा भाग व पाण्याची उपलब्धता आसनारा भाग आहे . परंतु येथील शेतकऱ्यांच्या आशा  अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खंडित झाल्या आहेत. 

४. केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
पाथर्डी मध्ये वाढलेल्या महागाईला केंद्र सरकार जबादार असून त्याचा पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तहसिल कार्यालयासमोर घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. केंद्राने  डिझेल ,पेट्रोल,घरगुती गॅस खतांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. केंद्र सरकार दुहेरी आर्थिक लूट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने करत  नायब तहसिलदार पंकज नेवसे यांच्याकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले.

५. औटी यांनी याचिका मागे घेतली
श्रीगोंदा तालुक्यात कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला मात्र याबाबत आवर्तन सोडण्यापूर्वी मुंबई हायकोर्टात औटी  यांनी याचिका  दाखल केली होती. यावर आज सुनावणी होती. ही याचिका याचिकाकर्ते औटी यांनी मागे घेतली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते घन:श्याम शेलार यांनी दिली आहे.

६. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन
सध्या देशात कोरोनाचे संकट आहे आणि अशा कठीण परिस्थितीत केंद्रातील एनडीए सरकार कडून इंधनाच्या दरात वाढ केली जात आहे त्यामुळे सर्वमान्य जनतेला महागाईचा फटका बसतोये, केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात असून त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर मोटारसायकल लोटत नेऊन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी आंदोलन करत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
 
७. ऐशी वर्षाच्या आजी आजोबांचा झिंगाट वर डान्स
आरोळे हॉस्पिटल मधील कोवीड सेंटर मधील विलीनीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहर्‍यावरील कंटाळा घालविण्यासाठी येथील समन्वयक सुलताना शेख यांनी रूग्णांना  झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले आणि काय आश्चर्य ऐशी वर्षाचे आजी आजोबांनी डान्स केला.

८. ४०० बेड्स चे कोविड केंद्र
कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटर च्या डेडिकेटेड   कोविड हेल्थ सेन्टरमध्ये 40 ऑक्सिजन बेड चे उदघाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक तथा संजीवनी युवा प्रतिष्ठान चे संस्थापक विवेक कोल्हे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, अनेक मान्यवर उपस्थित होते.

९. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जागेवर कोरोना चाचणी
श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये  पोलीस व प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची जागेवर कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव आल्यास या नागरिकाला थेट कोवीड सेंटर मध्ये भरती करण्यात येत असून कोरोना निगेटिव आल्यास दंडात्मक कारवाई प्रशासन करत आहे. 

१०. लहान मुलगा दारू विक्री करताना आढलून आला
राहुरी परिसरात एका हॉटेल वर लहान मुलगा दारू विक्री करताना सीसी TV फुटेज मध्ये आढळून आलाय पैसे कमावण्याच्या हव्यासापायी लहान मुलाचा जीव धोक्यात घातल्यामुळे त्तहसिलदार शेख यांचा चांगलाच पारा चढलेला दिसून येतोय तसेच या घटनेमुळे त्यांनी हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *