३ मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - मतदार संघातील त्या 10 गावांना आमदारांनी वार्यावर सोडले - स्नेहलता कोल्हे...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
1. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या भाजपाबद्दल जनतेत रोष - ना. थोरात
कोरोनाच्या मोठ्या संकटात करोनाशी लढण्याऐवजी भारताचे पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यस्त आहेत. लोकांना शाश्वत विकास पाहीजे भूलथापा व जाहिरातबाजी नको आहे. म्हणून मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्या भाजपा बद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला
2. खरीप हंगामासाठी पावणे सात लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित
अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगामाचा कलावधी आला असून कृषी विभागाची हंगामाच्या तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते आणि किटक नाशकांचा पुरवठा करण्यासोबत पेरणी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
3. मतदार संघातील त्या 10 गावांना आमदारांनी वार्यावर सोडले - स्नेहलता कोल्हे
करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत असतांना मृत्युच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. राहाता तालुक्यातील चितळी गावात एक महिन्यात मृत्युचे अर्धशतक गाठलेले आहे.
4. साईबाबा कोविड सेंटरमध्ये कर्मचार्यांची पूर्तता करावी
जिल्ह्यातील नावाजलेल्या शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थानच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेस, पुरेसा औषधसाठा तसेच आरोग्य कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असून याठिकाणी वरीलप्रमाणे सर्व जागांची तात्काळ पुर्तता करण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दिपक गोंदकर यांनी निवेदनपत्राद्वारे केली आहे.
5. अकोलेत सलग तिसर्या दिवशी अवकाळी पाऊस
अकोले तालुक्यात सलग तिसर्या दिवशी बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकरी सलगच्या पावसामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.
7. कोपरगावात ऑक्सिजन प्लांन्ट सुरू करण्यासाठी एकमत
करोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून दिवसागणिक मृत्युचा आकडा वाढत आहे. कोपरगावातही मृत्युच्या संख्येत माठी वाढ हात आहे. हे सर्व मृत्यु ऑक्सिजन अभावी होत असल्याने तालुक्यातील नागरीकांची काही प्रमाणात गरज भागवेल यासाठी ऑक्सिजन प्लांन्ट उभारण्यासंदर्भात नगराध्य विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत ऑक्सिजन प्लांन्ट उभारण्यासंदर्भात एकमत झाले आहे.
8. गर्दी टाळण्यासाठी गावात लस देण्याचे नियोजन करा
तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील 25 ते 30 गावांमधील लोकांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे करोनाचा धोका निर्माण होऊ नये, होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गावातच करोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन करा अशा स्पष्ट सूचना राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी तालुका प्रशासनाला दिल्या आहेत.
9. आ. रोहित पवारांकडून आरोळे कोविड सेंटरला पन्नास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आमदार रोहित पवार सतत कार्यरत आहेत. रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन त्याच्या घरी तो परतावा यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यास आमदार रोहित पवार कटिबद्ध आहेत.
10. माजी सैनिक हत्याकांड प्रकरणातील पाचवा आरोपी जेरबंद
पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील माजी सैनिक विश्वनाथ शिंदे यांच्या हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी सिने स्टाईलने जेरबंद केले आहे राहुल तुळशीराम मासळकर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे
11. नगर तालुक्यातील जेऊर मध्ये १० दिवसांचा जनता कर्फ्यू
नगर तालुक्यातील जेऊर येथे कोरोनाविषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज पासून ते मंगळवार पर्यंत ग्रामस्तरीय समितीच्यावतीने जनता कर्फ्यू करण्यात आला आहे जेऊर गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून करुणा चा कहर सुरू आहे आज पर्यंत पाचशेच्या वर कोरणा रुग्ण या ठिकाणी आढळून आलेत कोरोनाविषाणू ला आळा घालण्यासाठी ग्रामस्तरीय समितीने गावांमध्ये जनता कर्फ्यू पुकारला आहे.
No comments
Post a Comment