Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महापालिकेच्या व पोलीस पथकाने केली कारवाई

No comments

  News24सह्याद्री - महापालिकेच्या व पोलीस पथकाने केली कारवाई..पहा शहराची खबरबात मध्ये





TOP HEADLINES



1. कोरोना पासून वाचायचे असेल तर लसीकरण करा  
कोरणा प्रतिबंधक लसीचे सध्या लसीकरण सुरू असून या दरम्यान मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यामुळे काही गैरसमज पसरल्यामुळे लसीकरण करण्याचा विवेक मंदावला आहे यासाठी मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी पुढाकार घेत स्वतःचे लसीकरण करून घेतले लसीकरण केल्याने कोणताही अपाय होत नसून कोरोना  पासून वाचायचे असेल तर लसीकरण करा असा महत्त्वाचा संदेश या कृतींनी  या नागरिकांनी करून दिला आहे.

2. महापालिकेच्या व पोलीस पथकाने केली कारवाई
नगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथक व पोलीसच्या वतीने आज रोजी गंज बाजार,माळीवाडा, ख्रिस्त गल्ली,ग्राहक भांडार जवळ दुकानांवर १७,००० रु दंडात्मक कारवाई केली. या पथकाने आज दिवसभरामध्ये  कारवाई केल्या तसेच दारू विक्री करणाऱ्या टेम्पो सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. या कार्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

3. कोरोना संकटात काळातील परिचारिकांचे योगदान समाजासाठी महत्त्वाचे-आ.अरुणकाका जगताप
कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. माणूस माणसापासून दूर गेला असतानाही परिचारिकांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून समाजाची सेवा केली,आरोग्य क्षेत्रांमध्ये परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. परिचारिकांनी कोरोना संकट काळात आपले योगदान यशस्वी रित्या राबविल्याने अनेक कोरोना बाधित रुग्ण हे ठणठणीत बरे होऊन आनंदाने घरी परतले, जय आनंद फांऊडेशन वर्षभर विविध सामजिक उपक्रम राबवून आपले योगदान देत असतात असेच काम इतर संस्थांनी पुढे येऊन समाजासाठी करावे असे प्रतिपादन आ.अरुणकाका जगताप यांनी व्यक्त केले.
       
4. रिक्षा चालकांचे टॅक्सेस माफ करून अर्थीकी मदत करावी
जिल्ह्यातील परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालक यांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष दत्ता वामन यांनी  जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात द्वारे केली आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या वर्षभरापासून कोरूना ऑटो रिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईला आलेला आहे 

5. केडगाव अरणगाव रस्त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर-आ. संग्राम जगताप
शहर विधानसभा मतदारसंघातील केडगाव-अरणगाव रस्त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. कामाचे टेंडर निघाल्यानंतर लगेचच प्रत्यक्षात काम सुरू होईल, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. केडगाव-अरणगाव रस्ता हा नगर शहर विधानसभा मतदारसंघात आहे. दळणवळणाच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *