दुध आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद राहणार, दोन दिवसांत होणार निर्णय
मुंबई -
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येत्या दोन दिवसांत दुध आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. देशात सर्वाधिक मृत्यूदर कोल्हापूर जिल्ह्यात आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दूध आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, याबाबत पालकमंत्री सतेज पाटील दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहे.
जिल्ह्यात डेथ ऑडीट करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांकडून टास्क फोर्स कोल्हापुरात पाठवण्यात येत आहे. नमके मृत्यू कशामुळे वाढत आहे याचे ऑडीट विभागाकडून होईल, अशी माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. आढावा बैठकीला जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री उपस्थित नव्हते, त्यामुळे शंभर टक्के लॉकडाऊनचा निर्णय हे ते आल्यानंतर घेतला जाईल.
कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरु आहे. गोकुळनंतर जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला होता. मात्र नेटकरींनी याला विरोध दर्शवल्यामुळे आणि गोकुळ निवडणूकीचा संदर्भ जोडल्यामुळे हा निर्णय काही प्रमाणाक शिथिल करण्यात आला. मात्र याच काळात बारामतीसह इतर जिल्ह्यात जनता कर्फ्यूच्या माध्यमातून निर्बंध घालण्यातही आले होते.
No comments
Post a Comment