शहराची खबरबात - एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा
News24सह्याद्री - एमआयडीसीमधील कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. काेराेना राेखण्यासाठी गृह विलगीकरण सक्तीने बंद करा
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी रुग्णांचे घरी विलगीकरण सक्तीने बंद करा, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या.
2. नटराज’मध्ये ऑक्सिजन सिलेंडर वापराविना
ऑक्सिजन बेडसाठी नगरकरांची वणवण सुरू असतानाच महापालिकेच्या नटराज कोवीड सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या आरोग्य समितीने आज उघडकीस आणला. ही बाब समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने वीस ऑक्सिजन बेड करण्याची प्रक्रिया करण्यास होकार दर्शविला.
3. जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभेत शिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव
सामाजिक कामाच्या भावनेतून कोरोना संसर्गाच्या महामारीत जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना सेंटर उभारण्यासाठी एक कोटीहून अधिक निधी उभा केला आहे शिक्षकांच्या या स्तुत्य उपक्रमाची जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभेत दखल घेत.
4. रुग्णांसह पोलिसांना जेवणाचे डबे
घरघर लंगर सेवा व मोरया युवा प्रतिष्ठान च्या वतीने शहरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांसह कोविड सेंटरमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
5. अनाथ मुलांबाबत व्हायरल पोस्ट अविश्वसनीय
अनाथ मुलांना दत्तक घ्यावे अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरताहेत मुले दत्तक घेण्याची एक विशिष्ट प्रशासकीय प्रक्रिया असते अशा पद्धतीने कुणालाही मुलांना दत्तक घेता येत नाही तसेच अशा पोस्टच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment