काँग्रेसचे आमदार कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली; जीवे मारण्याची धमकी दिली
मुंबई -
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज नवनव्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना वर्ध्याच्या भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. डवले यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी निवेदन वजा तक्रार दिली आहे. ९ मे रोजी नाचन गाव येथे आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्र काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी थेट डॉ. अजय डवले यांना फोन केला. फोनवर बोलताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण झाले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
No comments
Post a Comment