Breaking News

1/breakingnews/recent

भविष्यात पंत भारतीय संघाचा कर्णधार होऊ; गावस्करांचे मत

No comments




News24सह्याद्री -

गावस्कर म्हणतात पंत भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतवर दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. पंतने या संधीचे सोने केले. त्याच्या नेतृत्वात दिल्लीला ८ पैकी ६ सामने जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित झाला, त्यावेळी दिल्लीचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानावर होता. पंतने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीने भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर प्रभावित झाले. भविष्यात पंत भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले.

यंदाच्या आयपीएलमध्ये युवा रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. पंतने यंदा पहिल्यांदाच एखाद्या संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे त्याला सतत कर्णधारपदाविषयी प्रश्न विचारले जात होते आणि साधारण सहाव्या सामन्यानंतर त्याला या प्रश्नाचा कंटाळा आल्याचे आपण पाहू शकत होतो. प्रत्येक सामन्यानंतर त्याला एकच प्रश्न विचारला जात होता. पंतमध्ये कर्णधार म्हणून यशस्वी होण्याची क्षमता असल्याचे आता दिसून आले आहे. त्याने काही चुका केल्या, पण कोणता कर्णधार चुका करत नाही? असा सवाल गावस्करांनी उपस्थित केला.

पंत हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि दबावाच्या परिस्थितीतही आपल्या बुद्धीचा वापर करून योग्य निर्णय घेतो. तो भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकेल, यात जराही शंका नाही. प्रतिभेला जेव्हा संधी मिळते, तेव्हा काय होऊ शकते याचे कर्णधार म्हणून पंत उत्तम उदाहरण आहे, असेही गावस्कर म्हणाले. पंत कर्णधार म्हणून यश मिळवताना फलंदाजीतही योगदान दिले. त्याने आठ सामन्यांत २१३ धावा केल्या.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *